बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका

इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

Updated: Oct 29, 2015, 01:28 PM IST
बिहारमध्ये ओवेसींना अटक आणि जामीनावर सुटका title=

पूर्णिया, बिहार: इत्तेहाद-ए-मुसलमीनचे(MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अटक केली गेली. ओवेसींवर आदर्श आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. 

अटक केल्यानंतर ओवेसींना जामिनावर सोडण्यात आलं. जिल्हा मॅजिस्ट्रेट बालमुरूगन जी. यांचं म्हणणं आहे की, ओवेसी एका धार्मिक स्थळावर निवडणूक प्रचाराचं भाषण देत होते. त्यामुळं बैसी पोलिसांनी त्यांना अटक केली. ओवेसींवर पूर्व सूचना न देता सभा घेणं आणि लाइडस्पीकर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

आणखी वाचा - चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश

तर तिकडे, ओवेसींनी आपण निवडणूक भाषण दिलं नाही असं म्हटलंय. त्यांचं म्हणणं आहे की, ते त्याठिकाणी प्रार्थना करायला गेले होते. कोणत्याही प्रकारचं निवडणूक भाषण देत नव्हतो. ओवेसींना एक तास पोलीस स्टेशन थांबावं लागलं.नंतर १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. 

ओवेसी पूर्णिया विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाचे उमेदवार गुलाम सरवरच्या प्रचारासाठी जाते होते. यानंतर ओवेसी किशनगंजला गेले. 

आणखी वाचा - अशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.