नवी दिल्ली: आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत कलह थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. आता पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्रातील आपचा चेहरा असलेल्या अंजली दमानिया यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. पक्षावर घोडेबाजारीचा आरोप लावत दमानियांनी राजीनामा दिला.
अंजली दमानियाने पक्ष सोडतांना पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. विशेष बाब म्हणजे जेव्हा प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पीएसीमधून काढण्यात आलं होतं, तेव्हा अंजली दमानिया यांनी केजरीवालांचा बचाव केला होता. मात्र आता दमानियांनी मयांक गांधींच्या पावलावर पाऊल टाकत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
आम आदमी पक्ष सोडण्याची घोषणा करत दमानिया यांनी ट्विट केलंय, "मी 'आप' सोडलाय. मी इथं बकवास करण्यासाठी आली नव्हती. माझं केजरीवाल यांच्यावर विश्वास होता. मी सिद्धांताच्या मुद्द्यावर त्यांचं समर्थन केलं होतं. मात्र मी घोडेबाजारीचं समर्थन करू शकत नाही."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.