देव तारी त्याला कोण मारी, रेल्वेची टक्कर लागूनही चिमुरडी बचावली

नरसिंहपूर जिल्ह्यातील गाडरवारा रेल्वे स्टेशनवर माल गोदामाजवळ एक महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलीसोबत जीव द्यायला केली. मात्र देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते घडलं. मालगाडीच्या धडकीनंतर आईचा मृत्यू झाला पण चिमुरडी बचावली.

Updated: Aug 25, 2015, 10:25 PM IST
देव तारी त्याला कोण मारी, रेल्वेची टक्कर लागूनही चिमुरडी बचावली title=

भोपाळ: नरसिंहपूर जिल्ह्यातील गाडरवारा रेल्वे स्टेशनवर माल गोदामाजवळ एक महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलीसोबत जीव द्यायला केली. मात्र देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते घडलं. मालगाडीच्या धडकीनंतर आईचा मृत्यू झाला पण चिमुरडी बचावली.

जीआरपी गाडरवाडाचे टीआय बी.पी. पांडे यांनी सांगितलं, सोमवारी संध्याकाळी सहा वाजता मालगाडीच्या धडकेत कमरून निशाचा मृत्यू झाला. तर तिची सात महिन्यांची मुलगी बुसरा बचावली. तिला अगदी किरकोळ जखम झाली. 

तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्याप आत्महत्येच्या कारणाबाबत माहिती मिळालेली नाहीय. पोलीस तपास करत आहेत. कमरुन निशाचा नवरा गुफरान खान, गाडरवाडामध्ये भाजीचं दुकान चालवतो. १८ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना ४ मुलं आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.