मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील ६२७ खातेधारकांची लिस्ट न्यायालयाला सोपवली आहे, ही यादी अजूनही बंद लिफाफ्यात आहे. मात्र परदेशी बँकांमध्ये ठेवलेला हा काळा पैसा धर्मनिरपेक्ष आहे. यात कोणत्याही धार्मिक आणि जातीय भिंती नाहीत, येथे कुणीही खालच्या किंवा वरच्या जातीचा म्हणून ओळखला जात नाही, इथे फक्त तो पैशांनी ओळखला जातो.
महत्वाचे मुद्दे
१) काळ्यापैशांत राजकीय पक्ष आहेत, प्रत्येक धर्म आणि जातीतले लोक आहेत, क्रीडा जगतापासून बॉलीवूडपर्यंत यात सर्वांचा समावेश आहे.
२) परदेशात असलेला काळापैसा फक्त कर चोरीशी संबंधित नाही, तर यात ड्रग्स, हवाला, अवैध हत्यारं, आणि दहशतवाद याशी संबंधित पैसा आहे.
३) काळा पैसा शेअर, बॉन्डस शिवाय सोने, किंमती खडे, हिरे, ज्वेलरी सारख्या स्वरूपात लॉकरमध्ये आहेत.
४) काही तज्ञांच्या मते काळापैसा ५०० अब्ज डॉलरपर्यंत असण्याची शक्यता आहे.
५) काळापैसा परत आणण्यात सोशल मीडियाची महत्वाची भूमिका आहे, काळा पैसा परत येईल, या विषयी जनता आशावादी दिसून आली आहे.
६) सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली स्पष्ट सांगितलं आहे, परदेशात ठेवलेल्या पैशांचा तपशील आणि नावं जाहीर करण्यात कोणत्याही देशाशी असलेल्या संबंधावर परिणाम होत नाही. सरकारला यापूर्वी वाटलं होतं की एखाद्या देशाशी झालेल्या संधी कराराचं यामुळे उल्लंघन होईल.
७) कोणताही चोरलेला डेटा घेण्यात कोणत्याही देशाशी झालेल्या संधिचं उल्लंघन होत नाही, हा सर्वांसाठी उपलब्ध असतो.
८) आता तर फक्त काही नावं देण्यात आली आहेत. मात्र काळापैसा परदेशातून परत आणण्यासाठी आणखी पाच ते सहा वर्ष लागण्याची शक्यता आहे. फिलीपाईन्स, पेरू आणि नायजेरिया या देशांना काळापैसा परत आणण्यासाठी खूप वेळ लागला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.