www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपला वाजपेयी आणि अडवाणींचा विसर पडल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावलाय. तसंच भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.
शिवाय आम्ही नाही तर भाजपनंच विश्वासघात केल्याचाही हल्लाबोल नितीश यांनी केलाय... त्यामुळं काडीमोड घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी दिलंय.
लालकृष्ण अडवानी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ संपला असून, भाजपला आता ज्येष्ठांचा विसर पडला आहे, जेडीयूने भाजपबरोबरील युती तोडण्याचा रविवारी निर्णय घेतला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत प्रतिक्रिया उमटल्या होता.
आज आयोजित जनता दरबारात नितीशकुमार म्हणाले, युती तुटण्यामागे आम्ही विश्वासघात केला. आम्ही विश्वासघात केलेला नाही. भाजपनेच विश्वासघात केलेला आहे. आम्ही जॉर्ज फर्नांडिस यांना विसरलेलो नाही. त्यांची सध्या प्रकृती ठीक नाही. पण, भाजपला आता अडवानींचा विसर पडला आहे. सध्याच्या भाजपमधील नेतृत्वाबाबत आम्हाला काही बोलायचे नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.