www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस नेते राज बब्बर यांना उपरती झालीय. बारा रूपयांमध्ये जेवण या विधानावर राज बब्बर यांनी खेद व्यक्त केलाय. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे असं बब्बर म्हणालेत.
मुंबईत फक्त बारा रूपयांमध्ये भरपेट जेवण मिळतं या राज बब्बर यांच्या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर राज बब्बर यांना उपरती झालीय. आपल्या बारा रूपयांच्या जेवणावरील वक्तव्यावर खेद व्यक्त करतानाच त्यांनी पक्षाला झालेल्या त्रासाबद्धल माफी मागितलीय. आपल्याला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आपण जे काही बोललो ते फक्त एका मर्यादित विभागापुरतं होतं, अशी सारवासारवही करण्याचा प्रयत्न राज बब्बर यांनी केलाय.
मात्र, या सगळ्या १५ आणि ५ रूपयांच्या विधानांवर काँग्रेस नेते अजय माकन यांनी मात्र खेद व्यक्त केलाय. हे पक्षाचं मत नाही. काही नेत्यांनी व्यक्त केलेल्या या विधानाशी आम्ही सहमत नाही. यूपीए सरकारच्या काळात देशातली गरीबी कमी कऱण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. गरीबीची टक्केवारी घसरली. ३७ टक्क्यांवरून गरिबी २१टक्क्यांवर आली आहे, असं अजय माकन यांनी ट्वीट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.