नागपूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अखेर आनंदाची बातमी दिलीय... ती म्हणजे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती उत्सव होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नागपुरात ही घोषणा केलीय.
‘यंदा गणपती उत्सव होणार नाही, ही अफवा आहे... ती कुणी पसरवली, याची चौकशी करणार’ असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यामुळं महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवावरील अनिश्चिततेचे सावट दूर झालंय.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्य शासनातर्फे आर्थिक साहाय्यही केलं जातं... यंदाही ते केलं जाईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
जर कोणी परवानगी नाकारली असेलच तर ही परवानगी पुन्हा दिली जाईल आणि दरवर्षीप्रमाणेच हा गणेशोत्सव साजरा होईल, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात होणाऱ्या गणेशोत्सवावरच सावटचं दूर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.