तीन तलाखविषयी शांतता बाळगणारेही अपराधी - योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन तलाखवरून चिड व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील एक तृतीयांश लोकं तीन तलाख मुद्द्यावर गप्प आहेत. या विषयावर शांतता बाळगणारेही अपराधी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

Intern Intern | Updated: Apr 17, 2017, 01:25 PM IST
तीन तलाखविषयी शांतता बाळगणारेही अपराधी - योगी title=

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन तलाखवरून चिड व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील एक तृतीयांश लोकं तीन तलाख मुद्द्यावर गप्प आहेत. या विषयावर शांतता बाळगणारेही अपराधी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी या विषयावर बोलताना द्रोपदीच्या वस्त्रहरणाचे उदाहरण दिले आहे. देश एक आहे मग येथे समान नागरी कायदे का नाहीत? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

लखनऊमध्ये पूर्व पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर आधारीत पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. सत्य हे नेहमी कडू असते त्यामुळे ते बोलण्याची हिम्मत खूप कमी लोकांमध्ये असते असेही ते यावेळी म्हणाले.