नवी दिल्ली : काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मंगळवारी औपचारिकरित्या कळवलंय. अपुरे संख्याबळ आणि पदाबाबतची आजवरची प्रथा याचा विचार करुन काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद नाकरण्यात आलंय.
सभागृहातल्या 10 टक्के संख्याबळाचा नियम पाहता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडे पुरेशी संख्या नसल्याचं लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय. तसंच पुरेशा संख्याभळाअभावी 1980 आणि 1984 मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याचा दाखलाही महाजन यांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.