नवी दिल्ली: पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.
आज सभागृहात मी या नेत्याचं नाव जाहीर करीन असंही स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. स्वराज यांनी राजीनामा दिल्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. त्यामुळं आता या रणनिती जशास तसं प्रत्यूत्तर देण्याची तयारी आता भाजपनं केलीय.
A senior Congress leader was pressing me hard to give diplomatic passport to the Coal Scam accused Santosh Bagrodia.@ANI_news
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 22, 2015
पाहुया बगदोरिया कोणत्या प्रकरणात आरोपी आहेत..
AMR Iron and Steel या कंपनीला महाराष्ट्रातील बंडेर इथं कोळसा खाण देण्यात आली होती.
- यामध्ये अनियमितता दिसून आल्यामुळं
- कलम ४२० (फसवणूक) ,
- कलम १२० (गंभीर अपराध)
- कलम ४०९ (सरकारी कर्मचाऱ्याऱ्याकडून पदाचा गैरवापर करून विश्वासघात) अंतर्गत पूर्व राज्यमंत्री संतोष बगदोरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
I will disclose name of the leader on the floor of the House.@imTejasBarot
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 22, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.