'आरजेडी जाग गया, नितिशकुमार भाग गया' - लालू

पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बैठक संपली आहे. राजदचे १३ पैकी ९ आमदार या बैठकीला उपस्थित होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 25, 2014, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बैठक संपली आहे. राजदचे १३ पैकी ९ आमदार या बैठकीला उपस्थित होते. यानंतर लालू यादव यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, आरजेडी जाग गया, नितिशकुमार भाग गया.
लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला आहे.
आमच्या आमदारांना नितिश कुमारांनी लाच दिल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.
नितिश कुमार आणि बिहार विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप लालू यादव यांनी केला आहे.
दरम्यान घोषणाबाजी करत लालू प्रसाद यादव यांनी राजभवनाकडे पायीच मोर्चा काढला आहे. यावेळी बिहार विधानसभा अध्यक्षांच्या घरावही दगडफेक करण्यात आली.
मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, लालूंच्या पक्षात मतभेद आहेत.
तसेच आरजेडीत फूट कशी पडली, याबाबत आपल्याला काहीही माहित नाही, मात्र जेडीयूमध्ये येणाऱ्यांचं आपण स्वागत करू, असंही नितिश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच लालू प्रसाद यादव फूट पाडतात, फूट पाडणे ही त्यांची सवय आहे, आमची नाही, असंही नितिश कुमारांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.