राहुल गांधींच्या हरिद्वारच्या रोडशोला तुफान गर्दी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हरिद्वारमध्ये रोड शो झाला. या रोड शोमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2017, 08:51 PM IST
 राहुल गांधींच्या हरिद्वारच्या रोडशोला तुफान गर्दी title=

हरिद्वार : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हरिद्वारमध्ये रोड शो झाला. या रोड शोमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. उत्तराखंडमध्ये १५ फेब्रुवारीला होणा-या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा ७५ किमीचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. 

या रोड शोमध्ये सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांसह तब्बल ५ हजार बाईकस्वार आणि दीडशेहून अधिक ढोलवादक सहभागी झाले होते. १०  विधानसभा क्षेत्रातील मतदारांशी यावेळी राहुल यांनी संवाद साधला. 

उत्रर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस मिळून निवडणूक लढवत आहेत. यावर यूपी को ये साथ पसंद है, अशी टॅग लाईन वापरण्यात आली आहे, लोकांमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची लोकप्रियता वाढत आहे.