राजस्थान : चूरु जिल्ह्याच्या रतनगड गावात आठ महिन्याच्या बाळाला डॉ़क्टरने चुकीचं इजेक्शन दिल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.
बाळ आजारी असल्यामुळे आईने त्याला डॉ. राजेंद्र कोचरकडे नेलं होतं. सुरुवातीला डॉ़क्टरनी त्याला तपासलं नसून, आधी इजेक्शन दिलं होतं यादरम्यान त्या चिमुकल्याला सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
येथील डॉ़क्टरांनी मात्र बाळाला मृत घोषित केलं. या घटनेनंतर त्या बाळाच्या नातेवाईकांनी डॉ. राजेंद्र कोचरविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी त्या डॉ़क्टरला अटक केली आहे.