नवी दिल्ली: देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे.
जगातल्या 20 सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांमधून 12 शहरे भारतातील आहेत, असंही या अभ्यासात समोर आले आहे.या प्रदूषणात 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी धूलिकण मिळाले आहेत. या धूलिकण शरिरात जावून फुफ्फुसं तसंच किडनीला नुकसान पोहोचवतात.
देशात ब्लॅक कार्बन धूलिकणांसाठी आग्रा सगळ्यात वरचढ आहे. इथं 10.4 मायक्रोग्रॅमचे ब्लॅक कार्बन धूलिकण मिळाले आहे.
आग्र्याच्या पाठोपाठ कानपूर कोलकाता, दिल्ली आणि वाराणसी अशी शहरं आहेत. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासमवेत देशातील 17 शहरात ‘डिसिमिलेटर यूनिट’लावले होते. हे युनिट इस्त्रोला नियमित डेटा पाठवत असते.
इस्त्रोच्या कार्यशाळेत ब्लॅक कार्बन, सूक्ष्म कणांसारख्या धूलिकणांना अभ्यासले जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.