नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, आता बनावच ड्रायविंग लायसेंस असणारे व्यक्ती नाही वाचू शकत. कारण आतका ई-गवर्नेंसनुसार ड्रायविंग लायसेंसचं इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. एक मोठा खुलासा करत त्यांनी म्हटलं की, देशात ३० टक्के ड्रायविंग लायसेंस हे बनावट आहेत.
गडकरींनी म्हटलं की, 'आता ड्रायविंग लायसेंस ई-गवर्नेंस अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणीकृत केले जाणार आहे. आरटीओला ड्रायविंग टेस्ट क्लियर करणाऱ्या व्यक्तीला ३ दिवसाच्या आता लायसन्स द्यावा लागणार आहे.
लायसेंस असणाऱ्या व्यक्तीची माहिती आता संपूर्ण देशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती बनावट लायसेंस नाही बनवू शकणार. कोणताही व्यक्ती असेल त्याला ड्रायव्हींग टेस्ट द्यावीच लागेल.
ड्रायविंग टेस्ट पास न झाल्यास त्याला लायसेंस कोणत्याही परिस्थीतीत नाही दिलं जाणार. देशात आतापर्यंत २८ ड्राइविंग एग्जामिनेशन सेंटर्स उघडण्यात आले आहेत. शिवाय अजून २००० सेंटर्स उघडले जाणार आहेत.
जर RTO ड्रायविंग टेस्टनंतर ३ दिवसाच्या आत लायसन्स नाही देणार तर त्या विरोधात लगेचच कारवाई केली जाणार आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि पारदर्शक वातावरण तयार होईल.