‘फास्ट फूड’ आऊटलेट जोरात...

एक काळ असा होता की हॉटेलात खाणं म्हणजे चैन समजली जायची. आता मात्र बाहेर खाणं आपल्या आयुष्याचा एक भाग होत चाललयं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 8, 2012, 02:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
एक काळ असा होता की हॉटेलात खाणं म्हणजे चैन समजली जायची. आता मात्र बाहेर खाणं आपल्या आयुष्याचा एक भाग होत चाललयं.
विदेशी नावं असलेलं फास्ट फूड भारतात आलं ते १९९६ साली. त्यावेळी सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचं आकर्षण असलं, तरी ते खिशाला परवडणारे नव्हते. आता लोकल टच मिळेलेले हे विदेशी पदार्थ प्रत्येकाला परवडणारेही आहेत आणि अनेकांच्या आवडीचेही... त्यामुळे या कंपन्यांच्या आऊटलेट्सची संख्या भारतात वाढू लागलीये. भारतात पूर्वी दिल्ली किंवा बंगळुरू सारख्या मोठ्या शहरात उघडलेले हे आऊटलेट्स आता छोट्या-मोठ्या शहरांतही दिसू लागलेत. खास करून तरूणाईचा ओढा या फुडचेन्सकडे अधिक आहे. १९९६ पासून गेल्या महिन्यापर्यंत यांची संख्या किती वाढलीये ते पाहूयात...
फूड ब्रँड आऊटलेट्सची संख्या
डॉमिनोज ५००
पिझ्झा हट आणि ३९९
केएफसी १६०
मॅक डोनाल्डस् २७१
सबवे २८२