www.24taas.com, नवी दिल्ली
एफडीआयच्या परीक्षेत यूपीए सरकार लोकसभेच्या वर्गात पास झालंय. आत्ता सरकारची खरी कसोटी राज्यसभेत लागणार आहे. राज्यसभेत आज एफडीआयवर चर्चा होतेय. उद्या मतदान होणार आहे.
एफडीआयच्या मुद्यावर यूपीए सरकारनं लोकसभेत सरशी केली असली तरी खरी कसोटी आता राज्यसभेत लागणार आहे. राज्यसभेत बहुमतासाठी १२३ सदस्यांची गरज आहे. युपीएकडे मात्र केवळ ११० सदस्य आहेत. सपा आणि बसपानं लोकसभेतील पुनरावृत्ती राज्यसभेतही करून मतदानास गैरहजर राहिले तर मात्र बहुमताचा आकडा खाली येऊन सरकारला १११ सदस्यांची आवश्यकता भासणार. राज्यसभेतही यूपीए सरकारची सर्व मदार सपा आणि बसपावर राहणार आहे. त्यामुळं मायावती आणि मुलायम सिंह यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष टिकून आहे.