who owns most expensive private jet in the world : जगातील श्रीमंतांची गणती ही त्यांच्या वार्षिक उत्पन्नापासून त्यांच्या एकूण संपत्तीपर्यंतच्या आकडेवारीवर आधारित असते. याच श्रीमंतांच्या श्रीमंतीविषयी सांगावं, तर कोणाचं घर इतकं आलिशान असतं की पाहणारेही अवाक् होतात. काहींच्या एकूण संपत्तीचा आकडा इतका मोठा असतो की डोळे विस्फारतात, तर काहींचे छंद इतके वेगळे असतात की, हे सगळं श्रीमंती असतानाच शक्य... असंच अनेकजण म्हणतात.
श्रीमंतीचं आणखी एक प्रतीक म्हणजे, या मंडळींकडे असणारे प्रायव्हेट जेट. खासगी मालकीचं विमान असणं हेसुद्धा जागतिक स्तरावर श्रीमंतीच्या निकषांपैकी एक आहे. सहसा व्यावसायिक, अब्जाधीश, लोकप्रिय व्यक्तींकडे खासगी विमानं किंवा प्रायव्हेट जेट असतात. जेफ बेजोस, मुकेश अंबानी, एलॉन मस्क, गौतम अदानी या मंडळींकडेही प्रायव्हेट जेट आहे. पण, जगभरात एक अशी व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे असणारं प्रायव्हेट जेट हे 'जगात भारी' आहे.
सर्वात महागडं प्रायव्हेट जेट असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, सौदीचे प्रिन्स अलवलीद बिन तलाल अल-सऊद. 20 बिलियन डॉलर इतकी संपत्ती असणाऱ्या या प्रिन्सकडे असणाऱ्या प्रायव्हेट जेटची किंमत 500 मिलियन डॉलर इतकी असल्याचं सांगितलं जातं.
अद्वितीय डिझायनिंगचा नमुना असणाऱ्या या खासगी विमानात 10 जणांसाठीची आसनक्षमता आहे. याशिवाय यामध्ये एक पूर्णाकार स्पा, प्रार्थना कक्ष आणि मनोरंजनासाठी एक खास लाऊंज आहे. प्राथमिक स्वरुपात या विमानाचा आकार पाहता ते खरंतर 800 प्रवाशांना नेऊ शकतं. पण, इथं मात्र प्रिन्सनं 10 जणांची आसनक्षमता ठेवत उर्वरित विमानात इतर सुखसोईंना प्राधान्य दिलं आहे. जगभरात अशी कैक श्रीमंत मंडळी आहेत, जी आपआपल्या खासगी विमानानंच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. सौदीचे हे प्रिन्सही यास अपवाद नाही. आपल्या आलिशान विमानानुळं ते कायमच चर्चेत असतात. आश्चर्याची बाब म्हणजे अंबानी आणि अदानींनाही त्यांनी विमानासंदर्भात मागं टाकलं आहे असं म्हणणं गैर नाही.