www.24taas.com , वृत्तसंस्था, रांची
चारा घाटाळ्यात दोषी आढळलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली जाईल.
पशुखाद्य गैरव्यवहारात लालूप्रसाद यादव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. १७ वर्षानंतर त्यांच्यावरील आरोप निश्चित होऊन त्यांना तुरूंगात जावे लागले. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या मुख्यमंत्री कालावधीत हा चारा घोटाळा झाला होता. लालू प्रकरणावर विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना दोषी ठरविण्यात आले.
लालूप्रसाद यांच्याव्यतिरिक्त बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, संयुक्त जनता दलाचे विद्यमान खासदार जगदीश शर्मा यांच्यासह ४५ आरोपी या गैरव्यवहारात दोषी ठरले आहेत. लालूंना शिक्षा ठोठवल्यानंतर त्यांची खासदारकी जाण्याची शक्यता असून त्यांची राजकीय कारर्कीद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास, लालूप्रसाद यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.