नवी दिल्ली : सणसमारंभ, लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव नेहमीच चढे राहतात. तुलसीविवाह पार पडला की लग्नसमारंभाना सुरुवात होते. त्यामुळे या काळात सोनेखरेदीही वाढते. साहजिकच त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाल्याने भाव वधारतात. मात्र यंदाच्या वर्षी जागतिक मंदी आणि सोन्याच्या खरेदीतील घट या दोन्ही गोष्टींच्या परिणामामुळे लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरु आहे.
या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात घसरण होऊन ते १०६२ प्रति औसवर विसावले. स्थानिक बाजारात ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति ग्रॅम २६, १५० आणि २६,००० इतके होते. मात्र विदेशी बाजारातील मंदी आणि सोन्याची मागणीत घट झाल्याने आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात १६५ रुपयांची घसरण होत ते २५,७५० आणि २५, ६०० वर येऊन पोहोचले.
सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. खरेदी आणि विक्रीतील चढउतारामुळे चांदीच्या दरात २७५ रुपयांची घसरण झाल्याने ते प्रतिकिलो ३४, २५ इतके होते. आठवडाअखेरीच याच दरात आणखी २२० रुपयांची घसरण होत ते ३३, ५९०वर पोहोचले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.