नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घटल्यानं आणि डॉलरच्या मजबुतीमुळं सोन्याची मागणी कमी झालीय. घरगुती बाजार फुटून मागणीत कमी आल्यानं सुद्धा दर कमी झाल्याचं कळतंय.
सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव 0.16% कमी होत 1149 डॉलर आणि चांदीचा भाव 0.7% नी कमी होऊन 15.50 डॉलर प्रति औंस होता. दिल्लीत सोनं 99.9 आणि 99.5 शुद्धचे भाव 345 रुपयांनी कमी होत क्रमश: 26,050 आणि 25,850 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झाले. तर गिन्नीचे दर 100 रुपयांनी कमी होऊन 23,700 रुपये प्रति 8 ग्राम झाले.
तर औद्योगिक युनिट्सद्वारे कमी खरेदी आणि व्रिकीच्या दबावामुळं चांदीचे दर 350 रुपयांनी कमी होऊन 35,150 रुपये किलो होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.