www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुका जवळ आल्यात... पडघम वाजायला सुरुवात झालीय. सरकारनं लोकांना खूश करण्याचे प्रयत्नही सुरू केलेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं देशातल्या जवळजवळ ८० लाख लोकांना एक गिफ्ट जाहीर करण्याची शक्यता आहे.
पुढच्या महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबरपासून कंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल १० टक्के महागाई भत्ता वाढून येण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनावर ८० टक्के महागाई भत्ता मिळतो जो सप्टेंबरपासून ९० टक्के होण्याची शक्यता आहे.
सरकारनं महागाई भत्त्यात वाढ केली तर हा भत्ता जुलै महिन्यापासून देय असेल. ३० ऑगस्ट रोजी ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे जाहीर होतील, त्यानंतर हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळजवळ ३० लाख निवृत्त पेन्शनर्सला होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.