आज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता

बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 27, 2017, 10:53 AM IST
आज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत विधेयकं सादर करतील. गेल्या आठवड्यात चारही विधयेकांना केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. सी-जीएसटी, आय-जीएसटी, यूटी-जीएसटी आणि भरपाई संबंधित विधेयकांचा यात समावेश आहे. 

आज विधेयकं माडंली, की त्यावर याच आठवड्यात चर्चा पूर्ण करून ती मंजूर करून घेतली जाण्याची शक्यता आहे. २८ मार्च रोजी या विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. ३० मार्चच्या अगोदर सरकारला जीएसटी विधेयक संमत करून घ्यायचंय.
 
संसदेचं सत्र १२ एप्रिल रोजी संपणार आहे... आणि १ जुलैपासून जीएसटी विधेयक देशात लागू करण्याची सरकारची तयारी झालीय. 

याशिवाय याच आठवड्यात अर्थसंकल्पही मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे चालू आठवडा अर्थिक घडमोडींचा असणार आहे.