नवी दिल्ली : अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या महेश शाह नावाच्या एका व्यापाऱ्याने आयकर विभागाला ही माहिती दिलीये की त्याच्याकडे 13 हजार 860 कोटी रुपयांचा काळा पैसा आहे. त्यांनी सरकारच्या आयडीएस(इनकम डिस्क्लोझर) योजनेअंतर्गत त्याने आयकर विभागाला ही माहिती दिलीये.
या योजनेअंतर्गत त्यांना 45 टक्के रक्कम म्हणजेच तब्बल 6237 कोटी रुपये टॅक्स म्हणून भरायचा होता. मात्र आयकर विभागाला काळ्या पैशाबद्दल माहिती दिल्यानंतर खुद्द महेश शाह गायब आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय शाह 30 नोव्हेंबरच्या काही दिवस आधीपासूनच गायब आहेत. 30 नोव्हेंबरला त्यांना घोषित केलेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम जमा करायची होती. मात्र अद्याप ती केलेली नाही. इनकम टॅक्स विभागाचे अधिकारी महेश शाह यांचा शोध घेतालत. या विभागाच्या म्हणण्यानुसार एका आठवड्यापासून शाह गायब आहेत.