www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.
या वर्षात देशातील सुमारे २ लाख जणांना आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. बँकेत एफडी किंवा बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या आधारावर आयकर खाते अशी नोटीस पाठवू शकते. ज्या व्यक्तींनी १५ जी किंवा १५ एच भरून आपली मिळकत कर सीमेपेक्षा कमी असल्याचा दावा केला असल्यास त्यांना याचा फटका पडू शकतो.
आयकर खात्याचं पोर्टल टॅक्सस्पॅनरडॉटकॉमचे सीएफओ सुधीर कौशिक यांनी या संदर्भात सांगितले, की आमच्याकडे असे अनेक प्रकरणं आली आहेत. ज्या व्यक्तींनी बँकेत जमा असलेल्या पैशांच्या आधारावर आयकर रिटर्न भरण्यास सांगितले आहे. या व्यक्तींनी कधीही आयकर रिटर्न फाइल केलेले नाही किंवा त्याचे कोणतेही नियमित उत्पन्न नाही आहे.
अशा व्यक्तींच्या खात्यात मोठी रक्कम आहे. त्यांनी १५ जी आणि १५ एच फॉर्म भरून आपले उत्पन्न आयकर कपातीच्या सीमेपेक्षा कमी असल्याचे सांगितले आहे. या फॉर्ममध्ये खातेधारक घोषणा करतात की, त्याचे करपात्र उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या व्याजातून टीडीएस कापण्यात येऊ नये.
अशा सुविधेचा वाढता दुरपयोग पाहात आयकर विभागाने फॉर्म १५ जी आणि १५ एच भरणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून असा फॉर्म भरला पाहिजे आणि कर सुटीचा दावा केला पाहिजे.
आयकर विभाग वेगवेगळ्या बँकेत एफडी किंवा बचत खात्याद्वारे टॅक्स चोरी करणाऱ्या नोटीस पाठविण्याचे काम सुरू केला आहे. आयकर खात्यातील माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरीचे प्रकरण समोर येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.