बलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...

दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.

Updated: Dec 10, 2014, 11:54 AM IST
बलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि... title=

नवी दिल्ली : दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.

पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी शिव यादव यानं तरुणीला इंद्रलोकजवळ तिच्या घरापाशी सोडलं होतं... यावेळी, जाताना पीडित मुलीच्या मोबाईलवरून त्यानं आपला मोबाईल नंबर डाईल करून तिचा नंबर मिळवला होता. कुणापाशी तोंड उघडलंस तर कुठूनही शोधून काढून ठार करेन, अशी धमकीही त्यानं या मुलीला दिली होती.

शिवकुमार जाताना भेदरलेल्या मुलीनं आपल्यावर बलात्कार झालाय, हे आपल्या एका मित्राला कळवण्यासाठी आपल्या मोबाईलवर मॅसेज टाईप केला. पण, पाठवताना मात्र तिनं चुकून आपल्या मोबाईलवरून नुकत्याच डाईल केलेल्या नंबरवर हा मॅसेज पाठवला.... आणि हा नंबर आरोप शिव यादवचा होता. यादवचा नंबर तरुणीच्या मोबाईलच्या डायलिंग हिस्ट्रीमध्ये सर्वात वरती होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा हा मॅसेज मिळाल्यानंतर आरोपी शिव यादव सतर्क झाला...  त्यामुळे त्यानं लगेचच कुटुंबासोबत नेपाळ पळण्याची तयारी केली होती. पण, वेळेतच पोलिसांनी त्याला मथुरेतून अटक केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.