मुंबई : खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरात बँकेकडून 0.3 टक्क्यांची कपात आणलीये.
आयसीआयसीआयच्या या निर्णयामुळे 30 लाखापर्यंतचे गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. सध्या गृहकर्जावरील व्याजदर महिलांसाठी 8.35 टक्के तर इतरांसाठी 8.40 टक्के इतके आहे.
गेल्याच आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली होती. एसबीआयनंतर आयसीआयसीआयनेही व्याजदरात कपात केलीये.