मी नशिबवान... तर लोकांनी कमनशिबींना का निवडून द्यावं - मोदी

राजधानी दिल्ली प्रचाराच्या रणधुमाळीनं चांगलीच तापलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग दुसऱ्या दिवशी रॅली आयोजित करण्यात आली होती. द्वारका इथं झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. 

Updated: Feb 1, 2015, 10:12 PM IST
मी नशिबवान... तर लोकांनी कमनशिबींना का निवडून द्यावं - मोदी title=

दिल्ली : राजधानी दिल्ली प्रचाराच्या रणधुमाळीनं चांगलीच तापलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग दुसऱ्या दिवशी रॅली आयोजित करण्यात आली होती. द्वारका इथं झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. 

यावेळी, मोदींनी काँग्रेसलाही त्यांनी टोला लगावलाय.  'आंदोलन करणारी सरकार नकोय... तर चर्चा करणारी, समस्या सोडवणारी सरकार दिल्लीत हवीय' असा टोला त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला लगावलाय. 

यावेळी, काँग्रेसलाही त्यांनी टोला लगावलाय. 'मी नशिबवान आहे... असं काँग्रेस म्हणतं... पण, मी नशिबवान असेल तर भारतीयांनी कमनशिबी लोकांना का निवडून द्यावं?... सव्वाशे करोड भारतीयांच्या आशीर्वादापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी असू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी, जनतेच्या जवळच्या विषयांना हात घालत 'पेट्रोलचे दर कमी झाले की नाही... डिझेलचे दर कमी झाले की नाही? असा प्रश्न त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उपस्थितांनाच केला. 

द्वारकावासियांना संबोधित करताना मोदी यांनी आपण खरेखुरे द्वारकावासी असल्याचं सांगितलंय. आता मी दिल्लीवाला झालोय, तुमचाच झालोय... असंही यावेळी मोदींनी म्हटलंय. 

यावेळी, भाजपच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदीही उपस्थित होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.