नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
या नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत तब्बल ज्वेलर्सनी 5000 कोटी रुपयांचे 15 टन सोने आणि चांदीची विक्री केली. ही माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी ईटीशी बोलताना ही माहिती दिलीये.
एकूण देशभरातील सोन्या,चांदीच्या विक्रीपैकी सर्वाधिक विक्री दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये झालीये. 15 टन हा विक्रीचा आकडा सर्वाधिक आहे. हा आकडा एका महिन्याच्या विक्रीपेक्षाही पाचपटीने अधिक आहे.
मोदींच्या घोषणेनंतर 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अनेक ज्वेलर्सची दुकाने सुरु होती. अनेकांनी आपल्या जुन्या नोटा देत सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.