हास्यकलाकार जसपाल भट्टी कार अपघातात ठार

प्रसिद्ध हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचं निधन झालय. आज पहाटे तीनच्या सुमारास जालंदरजवळील शहाकोटमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 25, 2012, 10:30 AM IST

www.24taas.com,जालंधर
प्रसिद्ध हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचं निधन झालय. आज पहाटे तीनच्या सुमारास जालंदरजवळील शहाकोटमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात त्यांचा मुलगा आणि एक अभिनेत्री जखमी झाली आहे,
सर्वसमान्यांना भेडसावणाच्या व्यथा मग महागाईचा प्रश्न असो, सरकारी खात्यांमधला भ्रष्टाचार असून किंवा इतर कोणतेही सामाजिक प्रश्न त्याला विनोदी बाज देत त्यांनी हे प्रश्न घराघरात पोहचवून जनजागृती केली. आपल्या वात्रटिकांमधून त्यांनी सरकारवर सडेतोड टीका केली.
फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टा हे त्यांचे गाजलेले कार्यक्रम. १९८० ते १९९०चा काळ त्यांनी दूरदर्शनवर आपल्या अभिनयानं गाजवला. जसपाल भट्टी हे सध्या मोहालीत आपल्या ट्रेनिंग स्कूलच्या कामात व्यस्त होते. तसेच ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी थँक्यू जिजाजी नावाची कौटुंबिक मालिका सब टीव्ही वर प्रदर्शित झाली होती.