नवी दिल्ली: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौऱ्यावर असून आज भारत आणि चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केलं.
यात मोदी म्हणाले, आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा अशा विविध विषयांवर आम्ही गेल्या दोन दिवसांत चर्चा केली. नागरी अणू करारावरही दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चेचा सुरुवात होईल. सीमा प्रश्नावरही चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली असून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, असं मोदींनी सांगितलं. चीनमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात भारतीय कंपन्यांवर घातलेले निर्बंधही मागे घ्यावे, अशी मागणीही जिनपिंग यांच्याकडे केल्याचं मोदींनी नमूद केलं.
तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीन इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली आहे. आगामी पाच वर्षात चीन भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल असंही जिनपिंग यांनी जाहीर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.