नवी दिल्ली : भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.
इस्त्रोच्या या उपग्रहावर पाच जबरदस्त शोध उपकरणं लावण्यात आलेत. इस्त्रोसाठी महत्त्वाची माहिती गोळाकरणं हे या उपकरणांचं प्रमुख काम असेल. मंगळावर काय आहे? तिथल्या मातीत काय आहे, हे या उपकरणांद्वारे इस्त्रोला कळणार आहे.
ही पाच उपकरणं आहेत LAP अर्थात लिमन अल्फा फोटोमीटर, MSM अर्थात मिथेन सेंसर फॉर मार्स,MENCA अर्थात मार्स एक्सोफेरिक कंपोजिशन एक्सप्लोरर, MCC अर्थात मार्स करल कॅमेरा किंवा TIR इमेजींग आणि TIS म्हणजेच स्पेक्ट्रोमीटर.
या उपकरणांद्वारे मंगळाबाबत तब्बल 30 प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकेल, असा इस्रोचा दावा आहे.
कसं चालेल या पाचही उपकरणांचं काम -
लिमन अल्फा फोटोमटर - मंगळाच्या वरच्या वातावरणातील ड्यूटेरियम म्हणजेच हायड्रोजनच्या कणांचं अस्थित्व किंवा त्यांच्या प्रक्रियेचा शोध घेईल.. या उपकरणाच्या लेंन्स अशा कणांना शोधून कंट्रोल रुममध्ये पाठवेल.
मिथेन सेंसर फॉर मार्स - याद्वारे मंगळावरील मिथेनच्या अस्थीत्त्वाचा शोध लागेल. मिथेन कार्बनच्या एक आणि हायड्रोजनच्या चार अणुंचं मिश्रण आहे. त्याचा अरबवा भाग जरी मंगळावर कुठे असला तरी हे उपकरण त्याचा अचुक शोध लावेल.. असं म्हटलं जातं की मंगळावर मिथेनचं भंडार आहे.
मार्स एक्सोफेरिक कंपोजिशन एक्सप्लोरर - मंगळाच्या वरील वातावरणाची प्राकृतीक संरचना याउपकरणाद्वारे कळू शकेल.. हायड्रोजन, मिथेन नसेल तर मंगळावर अन्य काही आहे का? या उपकरणाद्वारे मंगळावरी कोणत्याही नैसर्गीक खजीन्याचा शोध घेईल.
मार्स करल कॅमेरा - या कॅमे-याद्वारे मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले जातील. या कॅमे-याद्वारे 50 किलोमीटरपर्यंतची अचूक छायाचीत्र घेतली जातील कमीत कमी 25 मीटरच्या अंतरावरील कोणत्याही बिंदूवर फोकस करूनही हा कॅमेरा आपलं काम करु शकेल.
स्पेक्ट्रोमीटर - मंगळावरील खनिजांचा शोध घेणारं हे उपकरण आहे. याची किरणं मंगळाच्या पृष्ठभागात खोलवर जाऊन मंगळामध्ये कोणती खनीज संपत्ती दडली आहे याचा शोध घेईल.
भारताचं हे मिशन मंगळ यशस्वी झालं तर मंगळाविषयी भारताकडे अत्यंत महत्त्वाची माहिती असेल.. इतकच नव्हे अंतराळक्षेत्रात भारताची पकड आणखीनच मजबूत होईल यात शंकाच नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.