नवी दिल्ली : दिल्लीचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शिला दीक्षित यांनी काँग्रेसच्या भूमिकेच्या बरोबर उलट भूमिका मांडलीये. काँग्रेस दिल्लीत निवडणूका घेण्याची मागणी करत असताना भाजपनं सरकार स्थापन केलं तर त्याचं स्वागतच करायला हवं, असं दीक्षित म्हणाल्या.
आम आदमी पार्टीनं भाजपवर केलेले घोडाबाजाराचे आरोपही त्यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळलेत. दिल्लीमध्ये सध्या कुठल्याच पक्षाला निवडणुका नको आहेत. त्यामुळे भाजपनं सरकार स्थापन केल्यास त्याला अन्य पक्षांचे काही आमदार पाठिंबा देऊ शकतात, असा दावा दीक्षित यांनी केलाय.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केरळच्या राज्यपाल पदावरून पायऊतार व्हावं लागलेल्या दीक्षित यांना अचानक आलेला हा भाजप प्रेमाचा उमाळा राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.