सीकर : एखाद्या व्यक्तीच्या नावाचं आधार कार्ड तुम्ही पाहिलं असेल... देवाच्या नावाचंही आधार कार्ड तुम्हाला पाहायला मिळालं तर...
आधारकार्डावर 'हनुमान जी' असं नावासहित हनुमानाचा फोटो असलेलं कार्ड तयार झालंय... हा भारतातील सरकारी कारभाराचा महिमा आहे.
चक्क हनुमानाच्या नावाचं आधार कार्ड काढण्यात आलंय. हनुमानाच्या फोटोसहीत वडिलांच्या नावासमोर 'पवनजी' असं लिहिलंय. बरं... देवाच्या नावानं बनवलेलं हे आधारकार्ड पोहचवायचं कुठं? असा यक्षप्रश्न आता पोस्टखात्यासमोर उभा राहिलाय. पोस्टमन गेल्या तीन दिवसांपासून विचार करतोय की हे कार्ड नक्की पोहचवायचं तरी कुठं?
हा अजब-गजब प्रकार घडलाय राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात... दांतारामगढच्या एका पोस्ट ऑफिसमध्ये तीन दिवसांपूर्वी हे आधारकार्ड येऊन पडलं. त्यावर पत्ता आहे... 'वार्ड नंबर - सहा दांतारामगढ, पंचायत समितीजवळ, जिल्हा सीकर'
पत्ता योग्य पद्धतीनं नसल्यानं स्टाफनं हा पोस्टपॉकेट उघडून पाहिला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा कार्डधारक दुसरं तिसरं कुणी नसून साक्षात 'हनुमानजी, सन ऑफ पवनजी' होते.
कुणी बनवलं हे कार्ड...?
या आधार कार्डाचा पंजिकृत क्रमांक आहे 1018/18252/01821... तर आधार कार्ड क्रमांक आहे 209470519541... यावर एक मोबाईल क्रमांकही लिहिण्यात आलाय. हा नंबर विकास नावाच्या एका तरुणाचा आहे. विकासच्या म्हणण्यानुसार, तो दोन वर्षांपूर्वी आधार कार्ड बनविणाऱ्या कंपनीमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत होता आणि तेव्हाच त्यानं या कार्डासाठी अर्ज केला होता. परंतु, तेव्हा कार्ड बनलं नव्हतं.
त्यानंतर, 10 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मित्रांसोबत अर्ज केला होता. पण, फिंगर प्रिंटमुळे कार्ड बनू शकलं नव्हतं. पण, विकासनं दावा केलाय की हनुमानाच्या नावानं बनवण्यात आलेल्या या आधार कार्डावर त्याचा मोबाईल नंबर कसा आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.