Katrina Kaif Disease: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या आयुष्याचा जोडीदार विकी कौशलसोबत आनंदी आयुष्य जगतेय. दोघेही अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. तसेच आपल्या खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण सोशल मीडियात शेअर करताना दिसतात. पण फार कमी जणांना माहिती असेल की कतरिना कैफ 2 गंभीर आजाराशी झुंजतेय. कोणते आहेत हे आजार? काय असतात याची लक्षणे? आजार जडल्यास काय काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
2009 मध्ये कतरिना कैफला एंडोमेट्रिओमा असल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एंडोमेट्रिओसि हा गंभीर आजार नाही. एंडोमेट्रियल टिश्यू अंडाशयात वाढतात तेव्हा एंडोमेट्रिओमा तेव्हा होतो. कतरिना कैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिला दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. कतरिना कैफला अनेक प्रकारच्या ऍलर्जी आहे. ज्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि ग्लूटेनची ऍलर्जीदेखील समाविष्ट आहे. म्हणून तिला काळजीपूर्वक अन्नसेवनाचा, भरपूर भाज्या खाण्याचा आणि खारट पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.
शरीरात रक्ताची कमतरता असल्याने चक्कर येणे, अशक्तपणा आणि बेशुद्धी यासारख्या समस्या उद्भवू लागतात. जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी सामान्यपेक्षा कमी होऊ लागतात तेव्हा शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला शरीरात अशक्तपणाची समस्या उद्भवते. जर शरीरात रक्ताची कमतरता वेळेत दूर झाली नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात लोहाची कमतरता हे अशक्तपणाचे कारण मानले जाते. शरीरातील अशक्तपणाची लक्षणे आणि रक्ताच्या कमतरतेवर मात कशी करावी याची माहिती करुन घेऊया.
रक्त कमी होण्याची लक्षणे काय आहेत हे सर्वप्रथम माहिती करुन घेऊया. अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी आणि थंड हातपाय, धमन्या जलद काम करू लागणे ही रक्त कमी होण्याची लक्षणे आहेत.
शरिरात रक्ताची कमी असल्यास आपल्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत? याबद्दल जाणून घेऊया. शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा अशक्तपणा होतो तेव्हा आहारात पालक भाजीचा समावेश करावा. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. तसेच तुमच्या जेवणात टोमॅटो अवश्य खावा. टोमॅटो अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही दररोज सॅलड, भाज्या किंवा सूप बनवू शकता आणि पिऊ शकता.
जर तुम्हाला रोज अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज केळी खा. केळ्यामध्ये लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता लवकर भरून निघू शकते. यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दररोज 4 ते 5 मनुके धुवून दुधात उकळा. दूध गरम करुन प्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते दिवसातून दोनदा याचे सेवन करु शकता. मनुका शरीरात रक्त निर्मितीस मदत करते आणि अशक्तपणा देखील बरा करते.
डाळी आणि बीन्स हे अशक्तपणावर मात करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. मूग, तुर, राजमा, हरभरा, उडीद इत्यादी डाळींचा आहारात समावेश करावा. ते प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. जे लोह शोषण्यास आणि दिवसभर ऊर्जा राखण्यास मदत करतात. सुकामेवा आणि बिया ज्यामध्ये मनुका, खजूर, बदाम, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि अंजीर यांसारखी सुकी फळे यांचे सेवन करावे. हे पदार्थ लोह आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत. त्याच्या सेवनाने अशक्तपणा बरा होऊ शकतो. अंडी आणि लाल मांस खावे. अंड्यांमध्ये विशेषतः पिवळ्या रंगाच्या पिवळ्या भागामध्ये लोह असते. मांसामध्ये लोह देखील असते जे शरीराद्वारे चांगले शोषले जाते. याचे सेवन केल्याने लोहाची कमतरता सहज दूर होऊ शकते.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की, चीज, दही, लोणी इत्यादी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि लोह असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करतात. म्हणून तुमच्या आहारात संत्री, किवी, पपई, लिंबू आणि हंगामी फळे यासारखे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ समावेश करा.
(Desclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)