लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी उचलले योजनेचे पैसे; असा झाला उलगडा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केलीय. राज्यातील अर्ज केलेल्या महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला. लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी योजनेचे पैसे उचलले.

नेहा चौधरी | Updated: Feb 7, 2025, 06:17 PM IST
लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी उचलले योजनेचे पैसे; असा झाला उलगडा title=

राज्याच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणउकीत मोठा फायदा झाला. राज्यातील महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. मात्र याच लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींकडून सरकार आता पैसे परत घेणार आहे. या योजनेचे मागील 15 दिवसांपासून छाननी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्या हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणीने नाही तर लाडक्या भावांनी या योजनेचा पैसा उचलला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चार लाडक्या भावांनी घेतल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलाय. विशेष म्हणजे आत्तापर्यत त्या चौघांनी प्रत्येकी 9 हजार रुपये उचलले आहेत. या योजनेंतर्गत केवळ महिलांना लाभ दिला जातो. मात्र औंढा नागनाथ तालुक्यातील चौघांनी आधार कार्डवर महिलांचे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेतलाय. आत्तापर्यंत चौघा जणांनी सहा हप्त्याचे प्रत्येकी 9 हजार रुपये अनुदान ही उचलले असून शासनाने ज्या कुणाला योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तसा अर्ज करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून आठ अर्ज प्राप्त झाले असून चार महिला आणि चार पुरुषांचे अर्ज हे अर्ज आहेत. या योजनेतंर्गत लाटलेले प्रत्येकी 9 हजार रुपये त्या चौघांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी राजकुमार मगर यांनी दिली
 

हिंगोलीत 16 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र ठरले असून आठ लाभार्थ्यांनी माघार घेतली आहे, यामध्ये बहिणीचा बुरखा पांघरलेल्या चार लाडक्या भावांनी देखील कारवाईच्या बडग्याने माघार घेतल्याचे पुढे आलय.

लाडकी बहिण योजनेची 15 दिवसांपासून छाननी सुरू असून राज्य आणि जिल्हा पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आलीय. आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं पडताळणीतून समोर आलं आहे. मार्चपर्यंत सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवसेंदिवस अपात्र अर्जांची आकडेवारी वाढत चालली आहे. पडताळणीतून मार्चपर्यंत अपात्र बहिणींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीही ट्विट करत यासंदर्भात माहिती दिलीय.

5 लाख लाडक्या बहिणी अपात्र

- अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे
- संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी 2 लाख 30 हजार महिलांना वगळण्यात आलं
- 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1 लाख 10 हजार महिलांना वगळ्यात आलं
- 1 लाख 60 हजार महिलांनी योजनेतून नाव मागे घेतलं
- एकूण अपात्र महिलांची संख्या - 5 लाख
- सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात महाराष्ट्र शासन कटिबद्ध