नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी मोदींना आयडीबीआय बॅंकेचे खाजगीकरण करू नये, असे आवाहन केले आहे.
सरकार एका बाजूला बॅंकांना कर्जवसूली करण्यापासून रोखत असून दुसरीकडे बॅंकांचे खाजगीकरण करत आहे. तसेच देशातील उद्योगाचा विकास करण्यासाठी आयडीबीआय बॅंकेने गेल्या पाच वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.
खासगीकरण करू नका यासाठी केजरीवाल यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. 'मी विनंती करतो की आयडीबआय बॅंकेचे खाजगीकरण थांबवावे. बॅंकांना उद्योगपतींकडील कर्जवसूल करू द्या आणि मल्ल्यांसारख्या लोकांवर कडक कारवाई करू द्या. सरकार मल्ल्यासारख्या लोकांवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना देशाबाहेर जाऊ दिले जाते हे अत्यंत दुदैवी आहे.