नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील पराभवाचं खापर अखेर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर फोडण्यात आलं आहे. कारण किरण बेदी यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला आहे, असं आरएसएसने म्हटलंय.
'आरएसएस'ने आपले मुखपत्र पांचजन्यमध्ये 'आंकाक्षाओं की उड्डाण' या शीर्षकाखाली म्हटले आहे की, 'भाजपने किरण बेदी यांना पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करून मोठी चूक केली.
दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. याशिवाय, पक्षातील कार्यकर्त्यांमुळेही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.'
पक्षाच्या पराभवानंतर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 'आरएसएस'ने देखील भाजपच्या परभवावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला ७० जागांपैकी अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.