जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान

जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.

Updated: Dec 20, 2014, 09:50 AM IST
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.

जम्मू काश्मीरमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी मतदान होतंय. २१३ उमेदवारांचं भविष्य आज इव्हीएममध्ये बंद होणार आहे. कडाक्याची थंडी असूनही सकाळच्या सुमारास मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळालंय. जम्मूमध्ये सकाळी ८.०० वाजता मतदानाला सुरुवात झालीय. इथं सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मतदान सुरु राहील.

जम्मूमध्ये मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. नियमित पोलीस सेवेशिवाय इथं अतिरिक्त सुरक्षा दलाच्या ४०० कंपन्या (प्रत्येक कंपनीत जवळपास १०० जवान) तैनात करण्यात आलेत. इथल्या तीन सिमान्त जिल्ह्यात १८,२८,९०४ मतदार आहेत. यामध्ये ९,५९,०११ पुरुष तर ८,६९,८९१ महिलांचा समावेश आहे. मतदानासाठी इथं २३६६ मतदान केंद्र उभारण्यात आलेत.  
 मतदान के लिए 2366 मतदान केंद्र बनाए गए हैं।

तर दुसरीकडे झारखंडमध्ये विधानसभेच्या सोळा जागांसाठी मतदान होतंय. झारखंडमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झालीय. दुपारी ३.०० वाजेपर्यंत इथं मतदान होणरा आहे. 

दोन्हीही राज्यात विधानसभा निवडणुकीसांठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.