मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास

जमीयत उलेमा ए हिंद (फैजाबाद) चे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी धर्माबद्दल असे वक्तव्य केले त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुफ्ती इलियास यांनी आपल्या वक्तव्यात भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना आपले पालक सांगितले आहे. तसेच शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते. 

Updated: Feb 19, 2015, 03:01 PM IST
मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास title=

नवी दिल्ली : जमीयत उलेमा ए हिंद (फैजाबाद) चे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी धर्माबद्दल असे वक्तव्य केले त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुफ्ती इलियास यांनी आपल्या वक्तव्यात भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना आपले पालक सांगितले आहे. तसेच शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते. 

त्यांनी म्हटले की मुसलमान हे सनातन धर्मी आहेत. हिंदू देवता शंकर आणि पार्वती आपले आई-वडील आहे. ही गोष्ट मानण्यात मुसलमानांना कोणतीही अडचण नाही. बुधवारी अयोध्येत मुक्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. 

जमीयत उलेमाचे मुफ्ती इलियास यांनी सांगितले की हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे. मुफ्ती यांनी हिंदू धर्म नसून देशाशी जोडलेली संकल्पना आहे. आरएसएसच्या हिंदू राष्ट्राबद्दल बोलताना ते म्हणाले, मुस्लिम हिंदू राष्ट्राच्या विरोधी नाही. जसे चीनमध्ये राहणारे चीनी, अमेरिकेत राहणारे अमेरिकन तसेच हिंदूस्तानात राहणारे हिंदू आहे. 

सर्व धर्म एक आहे कारण सर्वांचा संदेश एक आहे. मुफ्ती यांनी म्हटले की प्रथम आम्ही भारतीय आहोत. धर्म त्यानंतर आहे. शांती, सद्भाव, बंधुता आपला संदेश असला पाहिजे. अनेक जण राजकारणासाठी धर्माचा वापर करतात. जो पण देशाच्या एकतेसाठी पुढे जाणाऱ्यांच्या आम्ही सोबत आहोत. 

मुफ्ती इलियास यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वक्तव्याचा विरोध होत आहे. फतेहपुरी मशीदीचे इमाम मुख्ती मुकर्रम यांनी वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. त्यांचा वक्तव्य चुकीचे आहे. त्याने केलेल्या वक्तव्याला आम्ही मानत नाही. हे त्यांचे राजकीय वक्तव्य आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.