मंगळुरूत गावगुंडांनी मुलाचे कपडे काढून रस्त्यावर केली मारहाण

नैतिकतेच्या नावाखाली मंगळुरूमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलीय. मंगळुरू शहरात रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्याला नैतिकतेच्या आधारे तरुणांच्या एका समूहानं अडवलं आणि तरुणाचे कपडे काढून त्याला मारहाण केली.

ANI | Updated: Aug 25, 2015, 04:27 PM IST
मंगळुरूत गावगुंडांनी मुलाचे कपडे काढून रस्त्यावर केली मारहाण title=

मंगळुरू, कर्नाटक: नैतिकतेच्या नावाखाली मंगळुरूमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलीय. मंगळुरू शहरात रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्याला नैतिकतेच्या आधारे तरुणांच्या एका समूहानं अडवलं आणि तरुणाचे कपडे काढून त्याला मारहाण केली.

आपल्या सोबत्याला वाचविण्यासाठीमध्ये आलेल्या तरुणीलाही मारहाण करण्यात आली. या गुंडांच्या या कृत्याचं कारण या जोपड्याचा धर्म वेगळा असल्याचं कळतंय. 

या गुंडांनी तरुणाला पोलला बांधून मारहाण केली आणि दोघांचा फोटा काढून सोशल मीडियावर शेअर केला. ही फारच धक्कादायक घटना आहे. धर्म वेगळा आहे म्हणून नैतिकतेच्या नावाखाली असं वागणं चुकीचंच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.