नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'आमची सहनशक्ती आता संपली आहे. आम्ही काही ना काही नक्की करू' असे ते म्हणाले. आता आम्ही जे दुःख भोगतोय, तेच दुःख शत्रूला पण देऊ; पण आता जागा आणि वेळ मात्र आम्ही ठरवू' असं वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी केलंय.
Sehne ki kshamta jo desh ki thi vo ab khatam ho gyi hai,kuch na kuch zarur karenge-Defence Minister Manohar Parrikar pic.twitter.com/wHpPutpjJX
— ANI (@ANI_news) January 16, 2016
हवाई दलाच्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी हा इशारा दिला आहे. जयपूरमध्ये आयोजित क्रेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मैदानावर आयोजित सैन्य भरती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
आपले जवान ISISच्या जाळ्यात फसू नयेत याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. वायूसेनेच्या एका जवानाला आपण पत्रकार असल्याची बतावणी करुन एका महिलेने काही संवेदनशील माहिती घेऊन पाकिस्तानला पुरवल्याचे एक प्रकरण नुकतेच उघड झाले होते.
अजून तरी अशा घटना केवळ कनिष्ठ स्तरापर्यंत मर्यादित आहेत. पण, अशा घटना घडू नयेत यासाठी काही काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केलंय.
जवानांच्या भर्ती वेळीही या गोष्टींचा विचार केला जाईल, तसेच जवानांना सोशल मीडिया वापरण्यासंबंधी एक संहिता जाहीर केली आहे, हे त्यांनी सांगितले