नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
वाराणसी येथील काँग्रेसच्या रोड शो दरम्यान प्रकृती बिघडल्याने सोनियांना दौरा अर्धवट सोडावा लागला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनियांना उत्तम प्रकृतीसाठी ट्विटरवरून सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.