नवी दिल्ली : देशाची पहिली महिला आयपीएस किरण बेदी यांच्या बाबतीत एक गोष्ट अनेकांना माहित आहे की त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीवर कारवाई करत दंड लावला होता. अशीच काही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील घडली होती. एका ट्रॅफीक हवालदाराने मोदींची गाडी थांबवली होती पण तेव्हा ते पंतप्रधान नव्हते.
नरेंद्र मोदी हे ज्या वेळेस भाजपचे प्रभारी म्हणून काम करायचे तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. एकदा मोदी भोपाळला आले होते तेव्हा त्यांची गाडी ही ट्रॅफिक हवालदाराने थांबवली होती. त्यानंतर मोदींनी त्या हवालदाराला शाबासकी देखील दिली होती.
1998 मध्ये मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वाजपेयी यांची सभा होती आणि मोदी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. सभा संपल्यानंतर मोदी भोपाळला आले. विमानतळावरुन ते भाजपच्या कार्यालयाच्या कारमध्ये निघाले. मोदींची गाडी रोखण्याचं कारण हे होतं की काही वेळातच तेथून दिग्विजय सिंग यांचं ताफा जाणार होता. तेव्हा दिग्विजय सिंग हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
ड्राइव्हरने हवालदारला सांगितलं की, गाडीत भाजपचे प्रभारी बसले आहेत. पण हवालदारावर याचा काहीही परिणाम नाही झाला. मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यानंतरच त्याने गाडी सोडली. हवालदाराचं कर्तव्यपरायणता पाहून मोदींनी त्या हवालादाराला शाबासकी दिली होती.