जम्मू-काश्मीर : अतिरेक्यांच्या झालेल्या चकमकीत मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले आहेत जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरमरण आलं. महाडिक स्पेशल फोर्सचे कमांडो होते, सध्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिग ऑफिसर होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संतोष महाडिक यांन श्रद्धांजली वाहिली आहे.
अतिरेक्यांविरोधात १३ तारखेपासूनच ऑपरेशन सुरु होतं. मात्र अतिरेक्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या महाडिक यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी अतिरेक्यांशी झालेल्या यशस्वी चकमकीमुळे त्यांचा ‘सेना मेडल’ देऊन गौरव करण्यात आला होता.
चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झाले तर सेनेचा एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. महाडिक हे साताऱ्याचे रहिवासी होते, मात्र त्यांचं कुटुंब सध्या उधमपूरमध्ये वास्तव्यास होतं. त्यांना ५ आणि ११ वर्षांची दोन अपत्य आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.