चेन्नई : भारताचं पहिलं मंगळ अभियान (मार्स आर्बिटर मिशन) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलंय. आपला जवळजवळ 90 टक्के प्रवास या अभियानानं पूर्ण केलाय.
या अभियानादरम्यान अंतराळात सोडण्यात आलेलं यान ‘लाल ग्रह’ आपल्या गन्तव्य स्थानाच्या अगदी जवळ पोहचलंय. या यानानं आपला 90 टक्के प्रवास पूर्ण केलाय.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’नं सोशल नेटवर्किंग पोर्टलवर आपल्या एका पोस्टमध्ये यासंबंधी माहिती दिलीय.
महत्त्वाचं म्हणजे, या योजनेंतर्गत जवळपास 450 करोड रुपये खर्च अपेक्षित आहे. मंगळयानाला आंध्रप्रदेशच्या श्री हरिकोटाहून गेल्य वर्षी 5 नोव्हेंबर रोजी अवकाशात धाडण्यात आलं होतं.
हे यान मंगळाच्या कक्षेत 24 सप्टेंबर रोजी प्रवेश करणार आहे. या योजनेमुळे वैज्ञानिकांना या ग्रहाशी संबंधीत माहिती मिळवण्यात मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.