शिमला : उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले.
यापूर्वी राजधानी दिल्लीपासून जवळच असलेल्या दादरीच्या बिसाहडा गावात बीफ खाल्ले आणि ठेवल्याची अफवा पसरल्यानंतर जमावाने मुहम्मद अखलाक यांना मारहाण करून ठार केले होते.
पाछडाचे डीएसपी योगेश रोल्टा यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांच्या हत्यात जखमी झालेल्या पाच गाय तस्करांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला.
रोल्टा यांनी सांगितले की स्थानिकांननी पाच गाय आणि दहा बैलांना घेऊन जाणारा एक ट्रकचा पाठलाग केला. संकटात पाहून ट्रक चालकाने गावकऱ्यांच्या गाडीला एकीकडून धडक मारल्याचे सांगितले जाते.
पोलिस आणि स्थानिकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ट्रक चालकाना लवासा चौकीजवळ वाहन थांबविले आणि काही गायींना ट्रकच्या खाली फेकले. एक गाय घटनास्थळीच मरण पावली. तर इतर गाई जबर जखमी झाल्या.
या तस्करांनी गायीला सोडून जंगलात पळून गेले. गावकरी आणि पोलिसांनी चार तासांनंतर तस्करांना पकडले. यावेळी गावकऱ्यांनी तस्करांना मारहाण केली. यात पाच तस्कर जखमी झाले. त्यातील नोमान या २८ वर्षीय तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.