www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे. मोनो रेल्वेमधून प्रवासी वाहतूकीच्या परवानगीसाठी आवश्यक अललेले सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएने सप्ष्ट केलंय.
सुरु होणार म्हणून गेले काही महिने चर्चेत असलेली , देशातील पहिली मोनोरेल्वे अखेर अखेरच्या चाचणीसाठी सज्ज झाली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर मोनो रेल्वेमधून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुक सुरु होणार आहे.सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी एमएमआरडीएने मोनो रेल्वेच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत.
जास्तीत जास्त वेगाची चाचणी यशस्वी झाली आहे. वडाळा ते चेंबूर अंतराला लागणारा वेळ तपासण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चढउतार करण्यासाठी लागणार वेळ तपासण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.