वर्षभरातील कामांचा आढावा देत मोदींनी साधला पत्रातून संवाद

नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी, पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधत लिहिलेलं संदेशवजा पत्र, वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलंय. 

Updated: May 26, 2015, 11:51 AM IST
वर्षभरातील कामांचा आढावा देत मोदींनी साधला पत्रातून संवाद title=

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी, पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधत लिहिलेलं संदेशवजा पत्र, वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलंय. 

आपल्या या एक वर्षांच्या कालखंडात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा, या पत्रातून मोदींनी आढावा घेतला आहे. तसंच देशाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगतानाच, सुरु केलेल्या नवीन योजनांचीही थोडक्यात माहिती दिली आहे. 

विरोधकांनी शेतकरी विरोधी प्रतिमा तयार केली असली, तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. काळ्या पैशासंदर्भात कडक कायदा करून परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना चाप बसवला आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सरकार देऊन 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचंही मोदींनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.