नवी दिल्ली : पुढील काही दिवसांत रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग वेबसाइट 'आयआरसीटीसी' प्रवाशांसाठी विशेष विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे.
या सुविधेनुसार प्रवाशांचे सामान हरवल्यास अथवा चोरी झाल्यास विम्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा त्याच प्रवाशांना मिळणार आहे, ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुक केलंय.
या विम्यांतर्गत लॅपटॉप, मोबाईल फोन्स किंवा यांसारख्या महाग वस्तूंवर विमा कवच मिळेल. ही विम्याची सुविधा 'न्यू इंडिया इन्श्युरन्स'तर्फे देण्यात येणार आहे.
'ग्राहक आणि विमा संरक्षण' घेण्याचा किंवा न घेण्याचा पर्याय प्रवाशांकडे उपलब्ध असेल... म्हणजेच, हा विमा प्रवाशांकरता बंधनकारक नाही. विमा प्रीमियम प्रवास कालावधी व प्रवास स्थिती यांवर अवलंबून असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.